27
May

शेतक-यांना ‍ ‍मिळाला दिलासा…

अंबड: अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करणे बाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री जालना ना.राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता पालकमंत्री यांनी पणनचे सचिव व मुख्यमंत्री यांना बोलून,अग्रहाने अंबड येथे कापूस खरेदी सुरू करणे बाबत सतत पाठपुरावा केल्याने अंबड येथे महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
आज राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांनी कापूस खेरदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.शेतकऱ्यांचा कापूस कोणत्या परिस्थतीमध्ये कापूस खरेदी करुन घेणे,कापूस खरेदीची गती वाढविणे,जिनिंगवरील पाळया वाढविणे,बाबत जिनिंगचे मालक यांना सुचना दिल्या.

यावेळी आ.नारायण कुचे, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन मा.मनोज मरकड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सतीश होंडे,उपसभापती ॲड सदिप नरवडे,माजी उपसभापती प.स.बाळासाहेब नरवडे, अंबड शहराध्यक्ष ॲड आफरोज पठाण, ‍शीवप्रसाद चांगले,समद बागवान, शीवाजी सानप,संदीप खरात,अर्जुन भोजने,काका कटारे,सलीम बागवान व गौतम ढवळे,अनील गीरे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आदी उपस्थि होते.

Leave A Comment