06
Apr

परभणी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आय,शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना,पीआरपी,(कवाडे गट) रिपाई (गवई गट) व मित्र पक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मा.राजेश उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ धाकलगाव,सा.पिंपळगाव,शहागड व गोंदी ता.अंबड व अंतवरवली टेंभी,पिंपरखेड ता.घनसावंगी येथे सर्कलनिहाय प्रचार सभा माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी घेतल्या.

यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे.निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये भयावह दुष्ळाकडे दुर्लक्ष केले जात आहे.हे दुर्देव आहे.शेतकरी मेटाकुटीला आला आहे.पाणी व चाऱ्या अभावी पशुधन कवडीमोल किमतीमध्ये विक्री करीत आहे.शासनाने दुष्काळची परिस्थती लक्षात घेता चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत तसे होतांना दिसत नाही.अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी,लोकांच्या हाताला काम नाही यामुळे शेतकरी व मजूर चिंताग्रस्त्‍ आहे.

          2014 मध्ये अनेक घोषणाचा पाऊस पाडून युती सरकार सत्तेवर आले परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही सर्व घोषणा हवेतच गेल्या बेरोजगार,कर्जमाफी,धनगर,मराठा,मुस्लीम आरक्षण,बोंडअळी अनुदान कोरडवाहू हेक्टरी 39 हजार तर बागायती 37 हजार 500 रुपये घोषणा केली परंतु प्रत्यक्षात 6 हजार पर्यंत दिली गेली.विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती,आरोग्य,सिंचन,शिक्षण,महावितरण आदीमध्ये पाच वर्षाच्या काळात युती सरकारने कोणतेही काम केलेले नाही.लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून लोकांना फसविण्याचे काम या युती सरकारने केले आहे.त्यामुळे आता कोणाच्या भुलथापांना  बळी बडू नका होऊ घातलेल्या परभणी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.राजेश विटेकर यांना दिनांक 18 एप्रिल रोजी घडयाळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवड द्या असे आवाहन यावेळी आ.राजेश टोपे यांनी मतदारांना केले.

Leave A Comment