05
May

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब,मा.छगनरावजी भुजबळ साहेब,मा.दिलीप पाटील वळसे साहेब,मा.सुनिलजी तटकरे साहेब,मा.राजेशभैय्या टोपे साहेब,मा.जितेंद्र आव्हाड साहेब आदींनी राज्याचे मुख्यंमत्री यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. परतीचा पाऊस आला नाही, पाण्याचे साठे कमी झाल्याने दुरून पाणी आणावं लागतंय. खरीप व रब्बी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहे. जिथे फळबागा आहेत त्या सुकून चालल्यात. शेतकरी हवालदिल झालेला आहे. पशुंची अवस्था आणखी गंभीर आहे. मराठवाड्यातल सर्वच जिल्हयाची परिस्थिती गंभीर आहे.
आघाडी सरकारने दुष्काळाला तोंड दिलं होतं, केंद्र व राज्य सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माणसं, पशु व शेती वाचवायचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या  काही भागातलं मोसंबीचं पीक वाचवायला पैसे पुरवले. त्या फळबागा वाचवल्याची काळजी घेतली होती.

पशुधनाच्या बाबतीत चारा छावण्या संख्या कमी असल्याने जनावरांचे हाल होत आहेत.सदरील छावण्या सुरु करण्यासाठी 8 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर सुरु झाल्या आहेत.छावनी मंजूरीकरीता तब्बल 44 टी राज्यशासनाने लागू केल्याने छावण्या सुरु करण्यास अडचणी येत आहेत.छावणी मंजूरीतील अटी व शर्ती पाहता काही अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे बाबत सुचना केल्या आहेत.

छावणीमध्ये किमान 300 ते 500 जनरावरांची अट आहे ही अट शिथिल करुन तहसीलदार अथवा प्रांत अधिकाऱ्याच्या अधिकारात त्यात परिस्थितीनुरुप आंशिक बदलास मान्यता देणे,प्रत्येक जनावर मालकास एकून लहानव मोठया जनावरापैकी केवळ 5 जनावरे छावणीत दाखल करता येऊ शकतात अशी अट नमुद आहे.दुष्काळामुळे सर्वच पशुधन धोक्यात आले आहे त्यामुळे एखादया मालकाकडे 5 पेक्षा जास्त जनावरांच्या जिवीताची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे जनावरांच्या संख्येची खातरजमा करणे,मोठया व लहान जनावरांकरीता प्रत्येकी 3 किलो व 1.5 किलो पेंड आठवडयाला देण्यात येते.दुध देणाऱ्या गाई-म्हशींकरीता हे पशुखाद्य अपुरे असून त्यामुळे मोठया व लहान जनावरांकरीता प्रति दिन 1 किलो व 0.5 अशी वाढ करणे,प्रति जनावर रु.90 अनुदानात निवारा शेड उभारणे,प्रकाश योजना,पाणी पुरवठा,चारा,मुरघास इत्यादी बाबीचा खर्च छावणी मालकाला सोसावा लागत असल्याने प्रति जनावर अनुदान वाढ करावी अथवा स्वातंत्र अनुदानाची व्यवस्था करणे, सन 2012-13 साला प्रामाणे चारा छावणी मंजूरीबाबत अधिक सकारात्मक रितीने धोरण अवलंबावे तसेच वर नमूद सुधारणाचा विचार करणेबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निदर्शनास आणून देऊन निवेदन देण्यात आले.

Leave A Comment