25
May

यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,कर्मवीर एकनाथ दगडू आवाड हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना जीजा नावाने ओळखले जात होते.आवाड यांनी वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली. शिक्षण घेत असतांनाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पृश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्‍यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा दिला. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला.

सन १९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली. ‘मानवी हक्क अभियान’ या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच ‘जग बदल घालुनि घाव’ हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले.त्यांचे कार्य युवकांसाठी प्ररेणादेणारे आहे.

Leave A Comment