18
May

वझर ता.जालना येथील गावाचा पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची आ.राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,दुष्काळाची भीषणता काळीज पिळवटून टाकणारी आहे.नागरिकांचे हंडाभर पाण्यासाठी प्रचंड हाल होतांना दिसत आहेत. विहीरीच्या पाण्याची पातळी घटली आहे.अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.असे आवाहन आ.राजेश टोपे यांनी केले.

Leave A Comment