26
May

अंबड: अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करणे बाबत निवेदनाद्वारे माननीय नामदार राजेश टोपे साहेब राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री जालना यांच्याकडे मागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता पालकमंत्री यांनी पणनचे सचिव सीसीआयची वरिष्ठ अधिकारी व मुख्यमंत्री यांना बोलून कापूस खरेदी सुरू करणे बाबत सतत पाठपुरावा केल्याने आंबड तालुक्यासाठी शहागड येथे सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.आज राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांनी सीसीआय केंद्राला भेट देऊन पाहणी केली.शेतकऱ्यांना त्रास होऊ नये,कापूस खरेदीची गती वाढविणे,जिनिंगवरील पाळया वाढविणे बाबत जिनिंगचे मालक यांना सुचना दिल्या.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन मा.मनोज मरकड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सतीश होंडे,रजियोददीन पटेल,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आदी उपस्थित होते.

1 Comment

 • A WordPress Commenter

  05 Oct 2020

  Hi, this is a comment.
  To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
  Commenter avatars come from Gravatar.

  Reply

Leave A Comment