18
May

वझर ता.जालना येथील चारा छावणीला माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी भेट दिली.छावणीत सुमारे 1200 जनावर आहेत.यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. चारा व पाण्याअभावी जनावरांची,पशुपालकांची होत असलेले हाल पाहून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या वरदान ठरत आहे. निष्क्रिय शासनाने चारा छावण्या लवकर सुरु न केल्याने आपल्या शेतकरी बांधवांनी जिवापाड जपलेली जनावरे कवडीमोल किमंतीत विकावी लागली.माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की,आता रडायचे नाही तर दुष्काळाशी लढायचे. तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.असे आवाहन आ.राजेश टोपे यांनी केले.

Leave A Comment